गॅस दरवाढीनंतर आता ‘रुपया’च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर

रुपया डॉलर दर: इराण युद्धामुळं पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळं भारतीय रुपयावर दबाव निर्माण झाला असून डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण नोंदवली गेली. याशिवाय शेअर बाजारातील घसरणीमुळंही रुपयावर दबाव वाढल्याचं सांगितलं जातंय.

Rupee Vs Dollar : रुपया 92.32 पर्यंत घसरला

बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 92.01 वर बंद झाला होता. गुरुवारी तो आणखी घसरणीसह 92.25 वर उघडला. त्यानंतर घसरण सुरूच राहिली आणि एका टप्प्यावर 92.35 प्रति डॉलरपर्यंत रुपया घसरला. गुरुवारी रुपया 0.3 टक्क्यांनी घसरून 92.3575 या पातळीवर पोहोचला. याआधीच्या 92.3475 या विक्रमी नीचांकी पातळीचाही हा स्तर पार करण्यात आला.

RBI हस्तक्षेप: आरबीआयचा हस्तक्षेप

दरम्यान, रुपयाची घसरण अधिक वाढू नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) बाजारात हस्तक्षेप केल्याचं समोर आलं आहे. या हस्तक्षेपामुळं रुपयाची घसरण काही प्रमाणात थांबवण्यात मदत झाली. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दर्शवणारा डॉलर इंडेक्स 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 99.47 वर पोहोचला.

Oil Price Impact : कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम

पश्चिम आशियामधील तणावामुळं कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूडचा दर पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला. इराणनं इशारा देत जगानं 200 डॉलर प्रति बॅरल तेलासाठी तयार राहावं, असं म्हटलं आहे.

भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करतो. तेल महाग झाल्यानं भारताचा व्यापार तुटवडा (Trade Deficit) वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यात होत आहे.

Economy Impact : रुपया घसरल्यास काय परिणाम?

– रुपयातील घसरण कायम राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

– इलेक्ट्रॉनिक्स, कच्चं तेल आणि इतर आयात वस्तू महाग होण्याची शक्यता

– परदेशात शिक्षण घेणं अधिक खर्चिक होऊ शकतं

– मालवाहतूक खर्च वाढल्यामुळं अन्नधान्य आणि इतर वस्तूंचे दर वाढू शकतात

– परकीय गुंतवणूकदार पैसे काढल्यास निफ्टी आणि सेन्सेक्सवर दबाव वाढू शकतो.

Crude Oil Price : तेलाच्या दरात पुन्हा तेजी

गुरुवारी कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी तेजी दिसून आली. ब्रेंट क्रूड 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचलं. भारतीय वेळेनुसार, गुरुवारी दुपारी 12 वाजता ब्रेंट ऑईलमध्ये 7 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन सुमारे 99 डॉलर प्रति बॅरल दर नोंदवला गेला. तर अमेरिकन WTI क्रूडमध्येही 7 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन तो सुमारे 94 डॉलर प्रति बॅरल दरावर व्यवहार करत होता.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.