गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताला तिहेरी धक्का
11 कोटी लोकांपर्यंत पोहोचवली आरोग्य मोहीम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आरोग्य क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराचे जगभरात कौतुक होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘निरोगी महिला, सक्षम कुटुंब मोहिमे’अंतर्गत तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवले आहेत. आरोग्य मोहिमेमध्ये 11 कोटींहून अधिक लोकांना सामावून घेत भारताने एक मोठी किमया केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी ‘निरोगी महिला, सक्षम कुटुंबे आणि विकसित भारत’ या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे वर्णन केले.
केंद्रीय आरोग्यमंत्री न•ा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट करून आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलेल्या तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची माहिती दिली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पहिला पुरस्कार एका महिन्यात आरोग्य व्यासपीठावर नोंदणी केलेल्या सर्वाधिक लोकांसाठी (3.21 कोटी), दुसरा पुरस्कार एका आठवड्यात ऑनलाइन स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी साइन अप केलेल्या सर्वाधिक लोकांसाठी (9.94 लाख) आणि तिसरा पुरस्कार एका आठवड्यात ऑनलाइन महत्वाच्या लक्षणांच्या तपासणीसाठी साइन अप केलेल्या सर्वाधिक लोकांसाठी (राज्य पातळीवर 1.25 लाख) आहे.
पंतप्रधान मोदींकडून मोहिमेची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी पोषण महिन्याच्या निमित्ताने ही आरोग्य मोहीम सुरू केली होती. ही मोहीम 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालली. या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट महिला, किशोरवयीन मुली आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे हे आहे. जे. पी. न•ा यांनी याला ‘महिलांच्या आरोग्यासाठी एक विक्रमी टप्पा’ असे म्हटले आहे.
19.7 लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोषण महिन्याच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य मोहीम सुरू केली होती. ही मोहीम महिला, किशोरवयीन मुली आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे, लवकर निदान सुनिश्चित करणे, आवश्यक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश आणि निरोगी भारतासाठी कुटुंबांना सक्षम बनविणे यावर लक्ष केंद्रित करते. या मोहिमेअंतर्गत 19.7 लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केल्यानंतर त्यात सर्व जिह्यांतील 11 कोटींहून अधिक लोक सहभागी झाले होती.
Comments are closed.