शीतल तेजवानी संदर्भातील सेवा विकास बँकेच्या कर्जाची माहिती समोर; व्याजसहित थकबाकी 100 कोटीच्या


पुणे: पार्थ पवार (Parth Pawar) आणि दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्या मालकीच्या ‘अमेडिया कंपनी’मार्फत करण्यात आलेल्या तब्बल 40 एकर जमीन व्यवहार प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आलं होतं ते म्हणजे  शीतल किसनचंद तेजवानीच्या (Sheetal Tejwani). याच शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. तिच्या पतीवर 42 कोटींचे, तर तिच्या कंपनीवर सहा कोटी रुपयांचे कर्ज असल्याचंही समोर आलं होतं. आता शीतल तेजवानी संदर्भातील सेवा विकास बँकेच्या कर्जाची माहिती समोर आली आहे.

व्याजसहित थकबाकी(outstanding) १०० कोटीच्या जवळपास

सागर सूर्यवंशी यांच्या रेणुका लॉन्सच्या नावाने कारसाठी २ वेगवेगळी कर्जे घेतली. एक कर्ज होतं १ कोटी १६ लाख  आणि दुसरं २ कोटी २४ लाख रूपयांचं, शीतल तेजवानी यांनी २ कारसाठी ४ कोटी ८० लाख रुपये कर्ज घेतले. सागर सूर्यवंशीने रेणुका लॉन्सच्या नावाने १६ कोटी ४८ लाख रुपये कॅश क्रेडिट घेतले. शीतल तेजवानी यांच्या नावावर घेतलेल्या आणखी एका कर्जाची आता रक्कम १० कोटी झालेली आहे. (outstanding) शीतल तेजवानी यांच्या परमाऊंट इन्फ्रा कंपनीवर ही बँकेचे ५ कोटी ९५ लाख लोन आहे. (outstanding) रेणुका लॉन्सच्या नावाने ही ५ कोटी २५ लाख लोन आहे. (outstanding) मुद्दल ४२ कोटी रुपये, व्याजसहित थकबाकी(outstanding) १०० कोटीच्या जवळपास जाते. कारसाठी घेतलेलं कर्ज दुसऱ्या कारणांसाठी वापरले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे शीतल तेजवानी?, वादग्रस्त इतिहास काय? (Who Is Sheetal Tejawani)

1.शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत.
2. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे
3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे
4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज
5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली
6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड
7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही
8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात
9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा
10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला
11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक

आणखी वाचा

Comments are closed.