ट्रेंड – बेलोन बॅलिपलाइक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या एका गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे गाणे तेलुगु भाषेतील ’बायीलोने बल्लिपलिके’ या अल्बममधील आहे. हे गाणे ऐकायला इतके गोड आहे की, ते ऐकतच राहावे असे वाटते. या गाण्यातील एकाही शब्दाचा अर्थ काही कळत नाही, मात्र ऐकायला गोड आहे. त्यामुळे या गाण्याला संपूर्ण देशभरातून पसंत केले जात आहे. अवघ्या काही दिवसांत चार मिलियनहून अधिक लोकांनी हे गाणे युटय़ुबवर पाहिले आहे. त्यामुळे हे गाणे इन्स्टाग्राम आणि युटय़ुबवर ट्रेंडमध्ये आले आहे. या गाण्यावर हजारो लोकांनी रील्स बनवल्या आहेत. पूर्ण इन्स्टाग्राम हलवून टाकणारं गाणं, लय भारी गाणं, खरंच कळत नाही, पण ऐकू वाटतं, अशा कमेंट नेटकऱयांनी केल्या आहेत. हे गाणे टॉलिवूड इंडस्ट्रीजमधील मंगली आणि नागव्वा या गायकांनी गायिले आहे. तर संगीत सुरेश बोब्बील यांनी दिले आहे.

Comments are closed.