अमेरिकेत भरधाव कारने 30 जणांना चिरडले, सात जणांची प्रकृती गंभीर

अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ईस्ट हॉलिवूडमध्ये शनिवारी भरधाव कारने 30 जणांना चिरडले. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

लॉस एंजेलिसच्या पश्चिम सैंटा मोनिका बुलेवार्डजवळ स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 2 वाजता ही घटना घडली. अज्ञात वाहन गर्दीत घुसले आणि नागरिकांना चिरडले. घटनेची माहिती मिळताच लॉस एंजेलिस पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.