बलुचिस्तान प्रांतात इंटरनेट सेवा बंद

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गृहयुद्धासारखी परिस्थिती उद्भवली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हत्या आणि बलूच नेत्यांचे होत असलेल्या अपहरणामुळे बलुचिस्तानात मोबाइल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सुरक्षा अलर्टनंतर क्वेटाला सोडून संपूर्ण बलुचिस्तान प्रांतात इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत मोबाइल, इंटरनेट बंद ठेवले जाणार आहे.

Comments are closed.