Interval Walking Benefits: इंटरव्हल वॉकिंग वेट लॉससाठी उत्तम पर्याय
आजकाल धावपळीच्या जीवनात व्यायाम करायला फारसा वेळ मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी चालणे हे फायद्याचे असते. आपला असा समज असतो की तासभर चालणे हे आरोग्यासाठी गरजेचे असते. यासाठी वेळ मिळत नसल्याने आपण कंटाळा करतो. मात्र तुम्हाला माहित आहे का इंटरव्हल वॉकिंग हा वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आता हे इंटरव्हल वॉकिंग म्हणजे नेमके काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याबद्दलच आपण आज जाणून घेऊया..
इंटरव्हल वॉकिंग म्हणजे काय?
इंटरव्हल वॉकिंग म्हणजे ब्रेक घेऊन चालणे. म्हणजेच तुम्ही काही काळासाठी वेगाने चालायचे तर काही काळासाठी हळू चालायचे. यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. शिवाय थकवा देखील जाणवत नाही. श्वास घेण्यासाठीही पुरेसा वेळ मिळतो. यामुळे दम लागत नाही.
इंटरव्हल वॉकिंग कसे करावे?
इंटरव्हल वॉकिंगमध्ये तुम्ही वेगाने चालणे आणि हळू चालणे असे चक्र सुरू ठेवा. म्हणजेच आधीचे 1 मिनिट वेगाने चालायचे तर पुढील 2 मिनिटे सामान्य चालायचे. हे तुम्ही 20-30 मिनिटे चालू ठेवावे.
इंटरव्हल वॉकिंगचे फायदे:
इंटरव्हल वॉकिंगमुळे तुमचे शरीर जास्त कॅलरी बर्न करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. इंटरव्हल वॉकिंगमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. यामुळे चयापचय वाढण्यास मदत होते. तसेच संशोधनानुसार, यामुळे एखाद्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
हे लक्षात ठेवा:
इंटरव्हल वॉकिंगची सुरुवात ही नेहमी वॉर्म अपने करणे गरजेचे आहे. तसेच शेवटी कुलडाऊन करून हे थांबवावे. कुलडाऊन म्हणजे अतिशय हळू हळू चालत मग थांबावे.
Comments are closed.