5 लाख गुंतवा, कमी काळात 10 लाख मिळवा, ‘ही’ आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
पोस्ट ऑफिस योजना: अलिकडच्या काळात लोक विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक (investment ) करतात. पण गुंतवणूक करताना दोन गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे आपली ठेव सुरक्षीत आहे का? आणि आपल्या ठेवीवर मिळणारा परतावा. पोस्ट ऑफिसची एक भन्नाट योजना (Post office scheme) आहे. यामध्ये सुरक्षित गुंतवणूक आणि मजबूत परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजना खूप लोकप्रिय होत आहेत. याचे उदाहरण म्हणजे पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना किसान विकास पत्र म्हणजेच KVP योजना. ही अशी योजना आहे जी केवळ 115 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
किसान विकास पत्र योजनेत विशेष म्हणजे सरकार स्वतः गुंतवणूकदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी देते. या सरकारी योजनेत 5 लाख रुपये गुंतवणाऱ्यांची रक्कम निर्धारित वेळेत 10 लाख रुपयांपर्यं कशी होत याबाबतची माहिती पाहुयात. आजच्या काळात, प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवायची असते. अनेकांना बचत अशा ठिकाणी गुंतवायची आहे जिथे त्यांना मजबूत परतावा मिळेल आणि पैसा देखील सुरक्षित राहील. तुम्हीही अशाच कोंडीत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जोखीम न घेता मजबूत परतावा देण्याच्या बाबतीत, पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांना उत्तर नाही. या यादीत किसान विकास पत्र (KVP) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्ही 100 च्या पटीत किमान 1000 रुपये गुंतवू शकता. विशेष म्हणजे यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही गुंतवू शकता. ही सरकारी योजना लोकप्रिय बनवणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात गुंतवलेले पैसे केवळ 115 महिन्यांत दुप्पट होतात.
गुंतवणुकीवर किती मिळतो परतावा?
सर्व पोस्ट ऑफिस बचत योजना (पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम) अंतर्गत, सरकार तिमाही आधारावर व्याज निर्धारित करते. या किसान विकास पत्र योजनेवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जाते. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की या सरकारी योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते.
5 लाख रुपयांचे कसे होतील 10 लाख
या सरकारी योजनेत गुंतवणूक करून पैसे दुप्पट कसे होतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने किसान विकास पत्र योजनेत 5 लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच 115 महिने या योजनेत राहिल्यास त्याला केवळ 7.5 टक्के व्याजाच्या आधारे 5 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर 10 लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. गुंतवणूकदाराला मिळालेल्या रकमेमध्ये कर देखील समाविष्ट आहे. सरकारने यापूर्वी किसान विकास पत्राचा परिपक्वता कालावधी 123 महिन्यांवरून 120 महिन्यांपर्यंत कमी केला होता आणि नंतर तो 115 महिन्यांपर्यंत कमी केला होता. म्हणजेच योजनेचा लाभ पूर्वीपेक्षा कमी वेळेत मिळतो.
खाते उघडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. यासोबतच गुंतवणूकदार किती खाती उघडू शकतो याची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. याचा अर्थ, तुम्ही 2, 4, 6 किंवा कितीही किसान विकास पत्र खाती उघडू शकता.
महत्वाच्या बातम्या:
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
अधिक पाहा..
Comments are closed.