…तर थेट गेम ओव्हर! कोलकाताला प्लेऑफसाठी इतक्या ओव्हर्समध्येच उरकावा लागणार मॅच; KKR समोर IPL

KKR प्लेऑफ समीकरण IPL 2026 : आज (24 मे) संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2026 चा अखेरचा लीग सामना रंगणार आहे. त्याआधी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण राजस्थानचा पराभव झाल्यास कोलकात्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात. मात्र फक्त विजय पुरेसा ठरणार नाही, तर नेट रनरेटमध्येही मोठी झेप घ्यावी लागणार आहे. सध्या पंजाब किंग्स चौथ्या स्थानावर असून त्यांचा नेट रनरेट +0.309 आहे, तर कोलकाता +0.011 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्ध केकेआरला केवळ जिंकायचं नाही, तर मोठ्या फरकाने जिंकून पंजाबला मागे टाकावं लागणार आहे.

आधी गोलंदाजी केल्यास KKR ला किती षटकांत लक्ष्य गाठावं लागेल?

जर दिल्लीने 180 धावा केल्या, तर कोलकात्याला हे लक्ष्य साधारण 12 ते 12.4 षटकांत पूर्ण करावं लागेल. जर दिल्लीने 200 धावा उभारल्या, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरला 12.1 ते 12.4 षटकांत सामना संपवावा लागेल.

आधी फलंदाजी केल्यास किती धावांनी जिंकावं लागेल?

केकेआरने 200 धावा केल्या, तर किमान 77 धावांनी विजय आवश्यक असेल. जर कोलकात्याने 225 धावा केल्या, तर 76 धावांनी जिंकणं गरजेचं आहे. 180 धावांच्या स्कोअरवरही केकेआरला तब्बल 78 धावांनी विजय मिळवावा लागेल.

पॉइंट्स टेबलमध्ये केकेआरची स्थिती

पंजाब किंग्स सध्या 13 गुण आणि +0.309 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स 13 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजचा सामना KKR साठी “करो या मरो” ठरणार आहे. आता पाहणं उत्सुकतेचं ठरेल की कोलकाता चमत्कार घडवत प्लेऑफमध्ये प्रवेश करते की दिल्ली त्यांचा खेळ संपवते.

हे ही वाचा –

Sara Tendulkar On Arjun : शेवटचा सामना, शेवटची संधी… अन् शेवटी अर्जुनला मैदानात पाहून वडील सचिननंतर बहीण सारा तेंडुलकरही भावूक, लिहिली लांबलचक पोस्ट

आणखी वाचा

Comments are closed.