तेल संकटामुळे 27 देशांची मदतीसाठी वर्ल्ड बँकेला गळ
इराण युद्धामुळे जगभरात इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे अनेक देशांची परकीय गंगाजळी आटत आहे. त्यामुळे एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 27 देशांनी जागतिक बँकेकडे आपत्कालीन निधी देण्याची मागणी केली आहे. यापैकी तीन देशांनी जागतिक बँकेकडून तत्काळ निधी मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली असून इतर 24 देशांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. या देशांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत, मात्र केनिया आणि इराकने निधी मागितल्याचे स्वतःहून सांगितले आहे.
Comments are closed.