पाकिस्तान कार स्फोट: 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाबाहेर एक मोठा स्फोट झाला, ज्यात पाच जण ठार झाले. तसेच अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. स्फोट झाला त्यावेळी कार कोर्ट कॉम्प्लेक्सच्या पार्किंग एरियात उभी होती. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. इस्लामाबादमधील सेक्टर जी-11 येथील न्यायिक संकुलाबाहेर मंगळवारी मोठा स्फोट झाला. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, कारच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतांश वकील असल्याचे सांगण्यात येत आहे.