इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला; भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद एका भीषण आत्मघातकी स्पह्टाने हादरली. न्यायालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्पह्ट झाला. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. कामकाजाचा दिवस असल्यामुळे न्यायालय परिसरात गर्दी होती. स्पह्ट झाल्यानंतर कारजवळचा परिसर आगीने वेढला गेला. स्पह्टामुळे न्यायालयाच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. बचाव पथक, सुरक्षा दल आणि बॉम्बशोधक पथकाने घटना स्थळी धाव घेतली. सुरक्षा दलांनी संपर्ण परिसर सील केला. तपासणी करून न्यायालयात अडकलेले न्यायाधीश, वकील तसेच इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यात हल्लेखोरही ठार झाला असून त्याची ओळख पटविण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

पाकिस्तानचे गृह मंत्री मोहसीन नकवी यांनी सांगितले की, हा एक आत्मघातकी हल्ला होता. स्पह्टात हल्लेखोरचे शिर धडावेगळे झाले. ते घटना स्थळी सापडले आहे. हल्लेखोराने न्यायालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयशी ठरल्यानंतर त्याने प्रवेशद्वाराजवळ स्पह्ट घडविला.

पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा, हिंदुस्थानवर केला आरोप

इस्लामाबाद येथे झालेल्या आत्मघाती स्फोट आणि अफगाण सीमेजवळ पॅडेट कॉलेजवर झालेला हल्ला, या दोन्ही घटनांमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे.

स्फोटाने न्यायालयाजवळचा परिसर हादरला

स्फोट एवढा भीषण होता की, सुमारे 6 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. अनेक इमारती आणि वाहनांची मोडतोड झाली. स्फोटाचा आवाज 6 कि.मी.पर्यंत ऐकू गेला. त्यामुळे जवळपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अफगाणिस्तानी तालिबानवर संशयाची सुई

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खवाजा आसीफ तसेच मोहसीन नकवी यांनी अफगाणी तालिबानवर हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. आसीफ यांनी थेट तालिबानवर या हल्ल्यातून संदेश दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हे युद्ध इस्लामाबादपर्यंत आणले आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान समर्थ आहे, असा इशारा आसीफ यांनी दिला आहे.

Comments are closed.