भाजपला ज्यावेळी सोडलं त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला, गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

उधव ठाकरे वर गिरीश महाजन: तुम्ही ज्या ब्रँडचा आणि शिवसेनेचा विषय करता आहेत, ती शिवसेना आणि ब्रँड हा तुमचा आता राहिलेलाच नाही. ब्रँड अजून काही संपायचं बाकी राहिला आहे का? असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan )  यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उधव ठाकरे) यांच्यावर टीका केली. हा ब्रँड त्यावेळीच संपला ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सोडून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला असेही महाजन म्हणाले.

एवढे पराभव झाल्यावर आपला ब्रँड राहिला कुठे?

बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला होते त्यावेळेचा विषय वेगळा होता. त्यांचे विचार वेगळे होते त्यांची आयडॉलॉजी वेगळी होती असे महाजन म्हणाले. पण तुम्ही तर सत्तेसाठी एका साध्या खुर्चीसाठी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात,  त्यामुळं तो ब्रँड तेव्हा संपल्याचे गिरीश महाजन म्हणाले. एवढे पराभव झाल्यावर तुम्ही शिकायला पाहिजे की आपला ब्रँड राहिला कुठे? असा सवाल महाजन यांनी केला.
मार्केटमध्ये काही ब्रँड येतात जातात काही पडद्याआड होतात तसा हा प्रकार असल्याचे महाजन म्हणाले.

राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

निवडणुका आल्या की वर्षानुवर्ष हा विषय होतो. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडायचे आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की हे कोणाच्या बापाचा बापाला किंवा पंजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळे करु शकत नाही. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी मतांवर डोळा ठेऊन मुद्दाम अशा प्रकारची वक्तव्य ते करत असतात असे म्हणत महाजन यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. या देशात आपण एक आहोत, अनेक भाषा या आपल्या देशात बोलल्या जातात. अनेक धर्माचे लोक आहेत, आपल्याला असं करुन चालणार नाही. संवादाचा सर्वात चांगलं माध्यम आज हिंदी आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल असे गिरीश महाजन म्हणाले. पण महाराष्ट्रात निश्चित आपली भाषा मराठी आहेच, मराठीचा आम्हाला अभिमान असल्याचे महाजन म्हणाले. मात्र बाहेर गेल्यावर हिंदीत बोलावं लागेल असे महाजन म्हणाले. निवडणुका आल्या की फक्त हे विषय का निघतात हे मला माहित नाही असे महाजन म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेला देखील महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आयोगाला वारंवार शिव्या द्यायच्या, निकाल आपल्या विरोधात लागला की निवडणूक आयोग बोगस असे म्हणायचे. लोकसभेला का तुम्ही असं म्हटलं नाही. त्यावेळी आमच्या पराभव झाल्यावर सुद्धा आम्ही म्हटलं नाही. त्यावेळी तुम्हाला गोड वाटलं. पण आता हरले लोकांनी तुम्हाला नाकारलं. मग मात्र निवडणूक आयोग हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळे तुम्हाला नालायक दिसत आहेत. काय बोलावं त्यांच्याबद्दल मला खरंच कळत नाही, असे महाजन म्हणाले.

उज्वल निकम यांना मंत्रिपद मिळणार का?

फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत देखील महाजन यांनी वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तीन-चार वेळा त्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी झालेल्या आहेत असे महाजन म्हणाले. उज्वल निकम यांना मंत्रिपद मिळणार का? यावर बोलताना महाजन म्हणाले की, उज्वल निकम हे राज्यसभेवर जरी गेले असतील तर त्यांना फक्त खासदार म्हणून घेतलेलं नसेल. वकील आहेत राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे होऊ शकतं. यात अशक्य काही नाही असे महाजन म्हणाले.

रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाला धोका आहे का? याबाबत बोलताना महाजन म्हणाले की, मला काय असं वाटत नाही, याला दिलं म्हणून त्याला धोका. आम्ही सुद्धा जिल्ह्यामध्ये भाजपचे दोन मंत्री आहोत. काही ठिकाणी तीन तीन चार चार मंत्री आहेत. मला नाही वाटत कुठे धोका आहे. पण शेवटी पक्षश्रेष्ठी कुणाला मंत्री करायचं की नाही करायचं?  कोणाला काढायचं कोणाला ठेवायचं? हे ते ठरवतील असे महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut on Devendra Fadnavis : ‘तुम्ही इकडे येऊ शकता!’ फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरचा संजय राऊतांनी एका वाक्यात निकाल लावला, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.