जसप्रीत बुमराह टेम्बा बवुमाला नको नको ते बोलून गेला; आयसीसी कारवाई करणार?, नेमकं काय घडलं?


Jasprit Bumrah vs Temba Bavuma Viral Video : जसप्रीत बुमराहने नकळत एक चूक केली, ज्यासाठी त्याला आयसीसीकडून फटकारले जाऊ शकते किंवा दंडही भरावा लागू शकतो. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला असे काहीतरी म्हटले, ज्यामुळे त्याची अडचण वाढू शकते. जसप्रीत बुमराहने जाणूनबुजून किंवा नकळत टेम्बा बावुमाला बटू म्हटले, जे बॉडी शेमिंगमध्ये येते.

कर्णधार टेम्बा बावुमाने जिंकली नाणेफेक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाने जिंकली.टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार भारतीय संघाला पहिल्यांदा गोलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहकडून एक मोठी चूक झाली. टेम्बा बावुमाच्या उंचीवर केलेली त्याची टिप्पणी स्टंप माईकमध्ये कैद झाली आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराह नेमकं काय म्हणाला?

घडलं असं की, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने बावुमाला टाकला. चेंडू सरळ त्याच्या पॅडवर जाऊन लागला. बुमराहने जोरदार अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी नॉट आऊटचा निर्णय दिला. त्यानंतर बुमराह आपल्या सहकाऱ्यांशी DRS घ्यायचा का याबाबत चर्चा करत होता. तेव्हा चुकून बावुमाच्या उंचीवर टिप्पणी करत त्याने म्हटलं की, छोटा आहे हा फलंदाज”. हेच स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आणि व्हायरल झालं.

पण, बावुमाचा भारतीय गोलंदाजांनी लवकरच निपटारा केला. तो केवळ 3 धावांवर कुलदीप यादवच्या चतुर गोलंदाजीवर आऊट झाला. ध्रुव जुरेलने त्याचा झेल घेतला आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, लंचच्या सुमारास त्याची अवस्था 3 बाद 105 अशी झाली. बुमराहने दोन तर कुलदीपने एक विकेट घेतली. ही बातमी लिहेपर्यंत बुमराहने रयान रिकेल्टन आणि एडन मार्करम यांनाही माघारी धाडत उत्तम कामगिरी केली होती.

हे ही वाचा –

Mohsin Naqvi Folded Hands Gesture As Sri Lanka Players : पाकिस्तानी चेअरमनवर हातापाया पडण्याची वेळ, श्रीलंकेच्या खेळाडूंसमोर गयावया, मोहसीन नक्वीचा VIDEO आला समोर

आणखी वाचा

Comments are closed.