चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर निराश दिसला जोस बटलर; म्हणाला…
बुधवारी (26 फेब्रुवारी 2025) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. खराब फॉर्ममुळे टीका होत असलेला इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने चॅम्पियन्स ट्रॉफीमधून अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर म्हटले आहे की, तो त्याच्या कर्णधारपदाबद्दल कोणतेही भावनिक विधान करणार नाही.
पराभवानंतर बटलर म्हणाला, “मी यावेळी कोणतेही भावनिक विधान करणार नाही. पण मी स्वतःबद्दल आणि इतर खेळाडूंबद्दल विचार करेन. आपण सर्व शक्यतांचा विचार करू. हे खूपच निराशाजनक आहे. मला वाटलं होतं की आपण आजचा सामना जिंकू शकलो असतो पण आम्ही हरलो.
तो म्हणाला, “अफगाणिस्तानने शेवटच्या दोन षटकांत आमच्याकडून सामना हिसकावून घेतला. याचे श्रेय इब्राहिम झद्रानला जाते ज्याने एक शानदार खेळी केली. जो रूटनेही शानदार शतक झळकावले. त्याच्यासोबत एखादा फलंदाज खेळू शकला असता तर बरे झाले असते.
बटलरच्या नेतृत्वाखाली, इंग्लंडला 2023मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक आणि 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी20 विश्वचषकात अपयश आले. विजयासाठी 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 49 धावांवर सर्वबाद झाला. 5 षटकांत 317 धावा केल्या. अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी म्हणाला, “एक संघ म्हणून आम्ही आनंदी आहोत आणि मला खात्री आहे की संपूर्ण देश आनंदी असेल. 2023 च्या विश्वचषकात आम्ही पहिल्यांदाच इंग्लंडला हरवले. मी नेहमीच म्हणतो की एक संघ म्हणून आम्ही सतत सुधारणा करत आहोत. तो सामना चुरशीचा होता पण आम्ही नियंत्रण राखले.”
हेही वाचा –
पाकिस्तानमध्ये सुरक्षा धोक्यात..! खेळाडूची पकडली कॉलर, मैदानात घुसला अनोळखी व्यक्ती
मोठा उलटफेर..! अफगाणिस्तानने इंग्लंडला चारली धूळ, चॅम्पियन्स ट्रॉफीतून तिसरी टीम बाहेर
अफगाणिस्तानचा शानदार विजय, इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्राॅफीतून पत्ता कट
Comments are closed.