काश्मीर: दहशतवादी सहकारी अटक

मंडळ / श्रीनगर

एनक्रिप्टेड अॅप्सचा उपयोग करुन दहशतवाद्यांना साहाय्य केल्याच्या आरोपात जम्मू-काश्मीरमध्ये 10 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रथम त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. नंतर अटक करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली आहे. या संशयितांच्या घरांवर काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या काऊंटर इंटेलिजन्स पथकाने धाडी टाकल्या होत्या, या धाडींमध्ये अनेक पुरावे हाती लागले असून या पुराव्यांमधून त्यांचा दहशतवाद्यांशी असलेला संपर्क स्पष्ट झालेला आहे. दहशवाद्यांशी गुप्तपणे संपर्क करण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Comments are closed.