अजित पवार गटाला मोठा धक्का; खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वास ठराव पारित
खामगाव एपीएमसी: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत(खामगाव बाजार समिती) नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बाजार समितीत 18 सदस्य संख्या असून यापूर्वी माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सभापती होईल. मात्र काँग्रेसने राजकीय खेळी करून यातील सदस्यांना हाताशी धरून तेरा विरुद्ध एक असा अविश्वास ठराव पास केला आहे. त्यामुळे यापूर्वी 25 वर्षापासून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या वर्चस्वाला व अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आजच्या विशेष अविश्वास ठराव सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खामगाव एपीएमसी: 10 विरुद्ध 13 मते समर्पित नॉल्टी मते
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालत होता. या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 18 सदस्य आहेत. तर सुभाष पेसोडे हे राष्ट्रवादीचे सभापती आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी खामगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. कारण 18 पैकी 13 सदस्य हे काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अविश्वास प्रस्ताव दाखल करून अज्ञात वासात निघून गेले होते.
खामगाव एपीएमसी: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ, भाजपच्या साथीने काँग्रेसची सत्ता
दरम्यान, आज 14 नोव्हेंबरला या अविश्वासावर मतदान पार पडले आणि हा अविश्वास प्रस्ताव पास होऊन आता भाजपच्या साथीने काँग्रेसची सत्ता या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर येण्याची शक्यता आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थानिक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सभापतीवर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आलाय. त्यामुळे 18 पैकी 13 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करून हे सर्व सदस्य अज्ञातवासात गेले होते. अशातच आता 13 विरुद्ध 01 अशा मतांनी अविस्वास ठराव पार करणे करण्यात आलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.