आर पारची लढाई! KKR चा टॉस जिंकून थेट गोलंदाजीचा निर्णय; दिल्लीला हरवून चालणार नाही, मुंबई इंडिय
कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2026 चा अखेरचा लीग सामना रंगणार आहे.
त्याआधी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कारण राजस्थानचा पराभव झाल्यास कोलकात्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात.
मात्र फक्त विजय पुरेसा ठरणार नाही, तर नेट रनरेटमध्येही मोठी झेप घ्यावी लागणार आहे.
सध्या पंजाब किंग्स चौथ्या स्थानावर असून त्यांचा नेट रनरेट +0.309 आहे, तर कोलकाता +0.011 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे.
त्यामुळे दिल्लीविरुद्ध केकेआरला केवळ जिंकायचं नाही, तर मोठ्या फरकाने जिंकून पंजाबला मागे टाकावं लागणार आहे.
Comments are closed.