IND vs ENG: केएल राहुल मँचेस्टरमध्ये इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर, ‘ही’ कामगिरी करताच रचणार मोठा इतिहास!
टीम इंडियाची नजर आता बुधवारी यजमान इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यावर आहे, जिथे पुन्हा एकदा मालिका बरोबरीवर आणण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल आणि हे साध्य करण्यासाठी भारतीय फलंदाजांना लॉर्ड्समधील पराभवातून सावरून काहीतरी वेगळं करावं लागेल. तसेच जेव्हा ही कामगिरी घडेल, तेव्हा विक्रमही आपोआपच त्यांच्या नावावर पडतील. मग तो केएल राहुलच (KL Rahul) का असेना, जो सध्या इतिहास रचण्यापासून केवळ 60 धावांपासून दूर आहे.
हे आकडे पार करताच केएल राहुलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 9,000 धावा पूर्ण होतील. सध्या राहुलने सर्व फॉरमॅट मिळून 218 सामन्यांत 39.73 च्या सरासरीने 8,940 धावा केल्या आहेत. आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध केएल राहुलचा फॉर्म चांगला राहिला आहे. 3 कसोटी सामन्यांतील 6 डावांत त्याने 62.50 च्या सरासरीने 375 धावा केल्या आहेत.
राहुलने 61 कसोटी सामन्यांत 10 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 35.26 च्या सरासरीने 3,632 धावा केल्या आहेत. त्यातील सर्वोत्तम खेळी १९९ धावांची आहे.
मात्र राहुलची ही कसोटी सरासरी दिग्गजांमध्ये कायमच चर्चेचा विषय राहिली आहे, कारण ती त्याच्या कौशल्याच्या तुलनेत कमी मानली जाते. वनडेमध्ये राहुलने 85 सामन्यांत 49.08 च्या सरासरीने 3,043 धावा केल्या आहेत, तर टी20 मध्ये 72 सामन्यांत 37.75 च्या सरासरीने 2,265 धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या मैदानावरील खेळपट्टी केएल राहुलला (KL Rahul) खूपच मानवतात. इंग्लंडमध्ये खेळलेल्या 12 कसोटी सामन्यांत त्याने 41.20 च्या सरासरीने एकूण 989 धावा केल्या आहेत. आणखी फक्त 11 धावा केल्या, तर इंग्लंडच्या मैदानावर 1,000 कसोटी धावा करणारा तो गेल्या 93 वर्षांतील फक्त चौथा भारतीय फलंदाज ठरेल.
सेना देशांतील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) त्यांच्या कामगिरीकडे पाहिलं, तर हे थोडं आश्चर्यकारक वाटेल, कारण केएल राहुलची कसोटीमधील सरासरी केवळ 35 च्या आसपास आहे, कारण त्याच्या 10 शतकांपैकी 7 शतकं याच कठीण विदेशी खेळपट्ट्यांवर आली आहेत.
Comments are closed.