ट्रॉफी उचलताच कर्णधार केएल राहुलची मन जिंकणारी कृती! विजयाच्या खऱ्या हकदार खेळाडूला दिली खास भेट
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा वनडे मालिकेत मोठा पराभव केला (Team india vs South Africa). केएल राहुलच्या (KL Rahul Under Captaincy) नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार कामगिरी करत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. त्यांनी कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
केएल राहुलने मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी उचलताच चाहत्यांची मने जिंकली. त्याने एमएस धोनीने सुरू केलेली एक खास परंपरा कायम ठेवली आणि या विजयाचा खरा मानकरी असलेल्या यशस्वी जयस्वालला एक संधी दिली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका 1-1 च्या बरोबरीवर होते आणि तिसरा व अंतिम सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करणार होता. टीम इंडियासमोर 271 धावांचे लक्ष्य होते आणि यशस्वी जयस्वालच्या (Yashavi jaiswal) नाबाद 116 धावांच्या अविस्मरणीय खेळीमुळे भारताने विजय नोंदवला.
याच कारणामुळे, मालिका जिंकल्यानंतर केएल राहुलने तिसऱ्या सामन्याचा हिरो असलेल्या यशस्वी जयस्वालच्या हातात ट्रॉफी सोपवली. यशस्वीने ती ट्रॉफी घेऊन टीम इंडियाचा विजय साजरा केला. एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली नेहमीच युवा खेळाडूंना संधी देत आले आहेत आणि राहुलनेही तसेच केले.
Comments are closed.