जमीन माफियांची वखवख सुरू आहे , पक्ष बदल्यावर सामंताची भूमिका कशी बदलते? ॲड.असीम सरोदे यांचा सवाल
वाटद एमआयडीसीसाठी दोन हजार दोनशे एकर जमीन हस्तांतरित करणार आहेत. त्यापैकी एक हजार एकर जमीन रिलायन्स डिफेन्सला देणार मग उर्वरित बाराशे एकर जमीन कुणाला देणार? जमीन माफियांची हr वखवख सुरू आहे. जमिनी हडप करण्याचा हा डाव आहे. लॅंड बॅंक बनवली जात असल्याचा खळबळजनक आरोप मानवाधिकार विश्लेषक ॲड.असीम सरोदे यांनी केला. उदय सामंत यांनी पक्ष बदलल्यावर भूमिका कशी बदलली असा सवाल करताना ॲड.असीम सरोदे यांनी 2019 पूर्वीचा एक व्हिडीओ दाखवून याचा पर्दाफाश केला. ते शनिवारी खंडाळा येथे वाटद एमआयडीसी विरोधी जनसंवाद सभेत बोलत होते.
ॲड. असीम सरोदे म्हणाले की, पायाखालची जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरं एमआयडीसीचे काम काय आहे? त्यांनी औद्योगिक विकास करायचा आहे. नेत्याच्या सांगण्यावरून ऐकणारे अधिकारी काम करत असल्याचा आरोप ॲड.असीम सरोदे यांनी सांगितले. आपण जेव्हा जमीन मोजणीसाठी अर्ज करतो तेव्हा सहा महिने प्रतिक्षा करावी लागते मग वाटद एमआयडीसीच्या बाबतीत तातडीने जमीन मोजणी करण्याची प्रेरणा कुठून येते? हा प्रश्न उपस्थित करताना जनसुनावणी म्हणजे काय? ती जनतेसमोर सुनावणी असायला हवी असे स्पष्ट मत ॲड.असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
राजकीय चमच्यांना प्रकल्प हवा आहे
सध्या चमचे आणि दलालांचे दिवस आहेत. राजकीय चमच्यांना ही वाटद एमआयडीसी हवी आहे. मॅनेजमेंट करणारे नेते निर्माण झाले आहेत अशावेळी प्रथमेश गवाणकर आणि ॲड.रोशन पाटील यांच्या सारखे लीडर निवडा असे आवाहन ॲड.असीम सरोदे यांनी केले. ॲड.सरोदे पुढे म्हणाले की, आजकाल न्यायव्यवस्थेवर कुणाचा विश्वास राहिला नाही.निवृत्त झालेले न्यायाधीशचं सांगतात की न्यायव्यवस्थेला कीड लागली आहे.अशावेळी आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल.अहिंसा पत्करून लोकशाहीच्या मार्गाने लढाई लढावी लागेल असे आवाहन त्यांनी केले.
दूषित वशिष्ठीच्या पाण्यासाठी डोळ्यातून पाणी काढा, असीम सरोदे यांचा टोला
ॲड.सरोदे यांनी मिंद्ये गटाच्या रामदास कदम यांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.ते म्हणाले की,रामदास कदम यांचा मुलगा सिध्देश कदम याला सत्तेचा गैरवापर करून प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवले आहे. त्या विरोधात मी न्यायालयीन लढाई लढत आहे.रामदास कदम संवेदनशील आहेत.आपण त्यांना रडताना पाहिले आहे.आज प्रदुषणामुळे वशिष्ठी नदीचे पाणी दूषित झाले आहे त्यासाठी तरी रामदास कदम यांनी डोळ्यातून पाणी काढावे.
अंबानींने उद्या शस्त्रांचा व्यापार केला तर?
ज्या देशांना चांगले पंतप्रधान मिळाले आहेत त्या देशांना युद्ध नको आहे.जर जगाला युद्ध नको असेल तर मग आपण शस्त्रांचा कारखाना कशासाठी बनवतोय.अंबानी हे व्यापारी आहेत त्यांनी बनवलेले शस्त्रे उद्या पाकिस्तानाला विकली तर उलट वापर आपल्यावरच होईल अशी भीती ॲड.असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
उदय सामंत चिपळूण एमआयडीसीतील त्या जागा परत करणार का?
चिपळूण एमआयडीसी मध्ये काही जागा घेण्यात आल्या होत्या. मात्र त्या जागांवर एकही प्रकल्प उभा राहिला नाही मग उद्योगमंत्री उदय सामंत त्या जागा परत करणार का? असा सवाल ॲड.असीम सरोदे यांनी उपस्थित केला.
मी जमीन वाचवणार नेता- प्रथमेश गवाणकर
आमच्याकडे आंबा,काजू आणि पर्यटन असताना वाटद एमआयडीसी का लागली जात आहे.आम्हाला आमच्या जमिनी विकायच्या नाहीत.आम्हाला काय रोजगार मिळणार हे आम्ही जिंदाल कंपनीला जागा देऊन अनुभवले.जमीन विकणारे नेते तयार झाले आहेत पण मी जमीन विकणारा नेता आहे असे आंदोलक प्रथमेश गवाणकर यांनी सांगितले.ॲड.रोशन पाटील यांनी रस्त्यावरची लढाई लढायला तयार रहा असे आवाहन करताना मी वाटद मध्ये येऊ नये म्हणून मला काहींनी धमक्या दिल्याचेही सांगितले.
Comments are closed.