चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, मारहाणीच्या घटनेवर नेमकं काय म्हणाले सुनिल तटकरे?

सुनील टाटकेरे: आज लातूरमध्ये (Latur) अखिल भारतीय छावा संघटना (Chava Sanghatana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावर सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. नेमकं काय झालं याची माहिती घेणार आहे. पण अशा प्रकारच्या घटना निश्चितच समर्थनीय नाहीत असे तटकरे म्हणाले. मी वर मीटिंगमध्ये होतो खाली काय झालं हे मला माहित नाही, पण असं होणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिलं. माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले. यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं.

सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना  दिलं.निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा… असं सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सुरज चव्हाण काय म्हणाले?

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. या घटनेनंतर सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे कार्यकर्ते आले होते, त्यांनी असंवैधानिक मागणी भाषेचा वापर केला आहे. त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच होते. तसेच त्यांनी त्यांच्या मागणीचं पत्र सुनिल तटकरे यांना दिले होते. तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली. पण त्यांनी तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. बाहेर जात असताना असंवैधानिक भाषेतचा वापर केला. त्यामुळं आमच्याकडून अशा प्रतिक्रिया उमटल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशास तसे उत्तर देणार असल्याचे सुरज चव्हाण म्हणाले.

अंगावर पत्ते टाकणे, असंवैधानिक भाषेचा वापर करणे हे कितपत योग्य वाटतं? सत्तेत आहोत याचा अर्त आम्ही सगळेच चूक करतो असे नाही. सत्तेत आहोत याचा अर्थ आमच्या नेतृत्वावर कोणी खालच्या पातळीवर बोलले तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असे सुरज च्वाहण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Suraj Chavan : दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं

आणखी वाचा

Comments are closed.