आधी टीम इंडियाचं उपकर्णधारपद गेलं, आता IPL मधूनही हकालपट्टी? 27 कोटींचा कॅप्टन ऋषभ पंतवर LSG कर
ऋषभ पंत कर्णधार LSG IPL 2026 : भारतीय कसोटी संघाची उपकर्णधारपदाची जबाबदारी गेल्यानंतर आता ऋषभ पंतच्या हातातून लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपदही निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात लखनऊने पंतवर तब्बल 27 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघाचा कर्णधार बनवलं होतं. मात्र सलग दोन हंगामांत त्याच्या नेतृत्वाखाली संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही.
27 कोटी खर्चूनही लखनऊला मिळाला फक्त पराभव!
आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. 14 सामन्यांत संघाला फक्त 4 विजय मिळवता आले आणि गुणतालिकेत लखनऊचा संघ थेट 10व्या म्हणजे शेवटच्या स्थानावर राहिला. यानंतर आता संघाचे क्रिकेट डायरेक्टर टॉम मूडी यांनी पंतच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पंजाब किंग्सविरुद्ध सात विकेट्सने झालेल्या पराभवानंतर बोलताना मूडी म्हणाले, “कर्णधारपदाची जबाबदारी पंतसाठी आव्हानात्मक ठरली आहे आणि निकालही तेच दाखवत आहेत. या दबावाचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत नाही ना, याचाही आम्हाला विचार करावा लागेल. हा हंगाम आमच्यासाठी कठीण राहिला असून प्रत्येक बाबीचं पुनर्मूल्यांकन केलं जाईल.”
पंत लखनऊचा कर्णधार बनला कधी बनला?
आयपीएल 2025 मध्ये पंत पहिल्यांदाच लखनऊचा कर्णधार बनला होता. त्या वेळी संघ सातव्या स्थानावर राहिला होता, तर यंदा परिस्थिती आणखी खराब झाली. पंतच्या नेतृत्वाखाली दोन हंगामांत लखनऊने 28 पैकी केवळ 10 सामने जिंकले. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटू आता लखनऊ पंतला रिलीज करण्याचाही विचार करू शकते, असं मत व्यक्त करत आहेत.
27 कोटींचा कॅप्टन ऋषभ पंत ठरला फ्लॉप
लखनऊने पंतला विक्रमी 27 कोटींना खरेदी केल्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र दोन हंगामांत त्याने 581 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 135.74 राहिला, जो त्याच्या कारकिर्दीतील 144.18 या सरासरी स्ट्राइक रेटपेक्षा कमी आहे.
आधी टीम इंडियाचं उपकर्णधारपद गेलं…
दरम्यान, अलीकडेच भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदासाठी केएल राहुल याची निवड करण्यात आली. तसेच पंतला वनडे संघातूनही वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत टॉम मूडी यांच्या वक्तव्यामुळे पंतच्या भवितव्याबाबत चर्चा आणखी रंगू लागली आहे. मूडी पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या अपेक्षा आणि दर्जानुसार कामगिरी करू शकलो नाही. फ्रेंचायझीच्या नेतृत्वाबाबत भविष्यात गंभीरपणे विचार करावा लागेल. प्रत्येक विभागाच्या कामगिरीचं विश्लेषण करून काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आता नव्याने सुरुवात करण्याची गरज असल्यासारखं वाटत आहे.”
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.