Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह
Maharashtra Live Blog Updates: कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचा वारकरी दांपत्य उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झाले होते. नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावाचे रामराव वालेगावकर आणि सौ.सुशिलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशीनिमित्त मानाचे वारकरी ठरले. मागील २० वर्षांपासून ते वारी करतायत, मंदिर समितीच्या वतीने शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आलाय. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते. तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोेरे देखील यावेळी उपस्थित होते. तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे दोन शाळकरी मुलं पुजेत सहभागी झाले होते. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.