Maharashtra LIVE Breaking: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरुपात एका क्लिकवर…

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

BMC ची आरक्षण सोडत जाहीर; 2017 मध्ये कोण-कोण विजयी?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2025) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation Elections) तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षण (BMC Ward Reservation) सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. (BMC Election 2025)

मुंबई महानगरपालिकेतील एकूण सदस्यसंख्या 227
महिलांसाठी राखीव  114
अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15  महिला 8
अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिला एक
ओबीसी राखीव 61 महिला 31
सर्वसाधारण वॉर्ड 149 महिला राखीव 74

दिल्लीत बॉम्ब स्फोट, मुंब्र्यात छापेमारी; ATS कडून दोन जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक साहित्यही ताब्यात घेतलं

नवी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर (दिल्ली बॉम्बस्फोट) देशभर छापेमारी सुरू असून महाराष्ट्रातली कारवायांना वेग आला आहे. महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने (महाराष्ट्र एटीएस) मुंब्र्यात छापेमारी करून दोन जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचे अॅनालिसिस केलं जाणार आहे. मुंब्र्यातील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक बॉम्ब स्फोट (लाल किल्ल्याचा बॉम्बस्फोट) झाला. त्यामध्ये 12 जणांचा जीव गेला आहे. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. त्याच संदर्भात दिवशभर देशातील विविध भागात कारवाई करण्यात आली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Comments are closed.