Maharashtra Nagarparishad LIVE: राज्यात 264 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोण
सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक आज होत असून यातील अनगर आणि मंगळवेढा या दोन ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे.आज मतदान होत असलेल्या यातील दहा नगरपालिकांमध्ये सात ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होत असल्याने दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा प्रथमच सर्व नगरपालिकेत कमल चिन्हावर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने भाजपचे चिन्ह वर पोहोचवण्यात त्यांना यश आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ,कुर्डूवाडी , करमाळा, मोहोळ, अक्कलकोट ,दुधनी आणि मैंदर्गी अशा सात नगरपालिकात भाजप सेनेमध्ये दोस्तीत कुस्ती होतानाचे चित्र आहे. यातील सांगोल्याची निवडणूक सुरुवातीपासून गाजत असून शहाजी बापू पाटलांना एकटे टाकल्यानंतरही त्यांनी सत्ता राखण्यासाठी जोरदार टक्कर दिली आहे. विरोधी महाविकास आघाडी मधून अकलूज नगरपालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुतारी चिन्हावर उभाठाला सोबत घेत पॅनल उभा केल आहे. याच पद्धतीने कुर्डूवाडी नगरपालिकेत थेट शिंदे सेने सोबत युती करून भाजपला आव्हान दिली आहे.
Comments are closed.