नोकरीची हमी देऊन सरकारने बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले! महाराष्ट्र राज्य संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ट्रेनिंग दिलेल्या 1 लाख 34 हजार बेरोजगारांना सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याने त्यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेत प्रशिक्षण घेतल्यानंतर शासकीय-निमशासकीय आस्थापनांमध्ये रिक्त पदावर काम देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र हे आश्वासन सरकारने पूर्ण केले नसल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने केला आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगार युवक-युवतींना शासकीय-निमशासकीय वेगवेगळ्या कार्यालयामध्ये केवळ पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी नोकरी दिली जाते. मात्र पाच महिन्यांनंतर काय, असा प्रश्न या बेरोजगारांसमोर उभा राहतो. राज्यात या योजनेंतर्गत तब्बल 1 लाख 34 हजार जणांची नोंदणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आहे.
…तर तीव्र आंदोलन
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र सरकारने आता तरी आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटना प्रमुख अलीम सय्यद यांनी दिला आहे.
Comments are closed.