पुतण्यानंतर आता ममता बॅनर्जीं रडारवर? कालीघाट ऑफिसमध्ये सीआयडीची टीम, नोटीसही दिली
पश्चिम बंगाल राजकीय संकट अद्यतने: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनंतर आता राज्याच्या तपास यंत्रणांच्याही रडारवर ममता बॅनर्जी आल्याचं दिसून येतंय. मंगळवारी सीआयडीचे (CID) एक विशेष पथक थेट कोलकाता येथील ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट (Kalighat) कार्यालयात धडकले. यामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीआयडीचे हे पथक ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना एका स्वाक्षरी फेरफार प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी तिथं पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच तपास यंत्रणेनं त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केलं होतं. त्यावरून सध्या बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय.
सब्यसाची दत्ताला अटक : माजी आमदार सब्यसाची दत्ताला अटक
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि बिधाननगर महानगरपालिकेचे माजी महापौर सब्यसाची दत्ता (Sabyasachi Dutta) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सॉल्ट लेक परिसरातील एका नामांकित व्यवसायिकाकडून सुमारे 1.05 कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बिधाननगर उत्तर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा राजारहाट येथील त्यांच्या निवासस्थानावरून ही अटक केली. त्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, न्यायालयात घेऊन जात असताना संतप्त नागरिकांनी सब्यसाची दत्ता यांच्यावर अंडी आणि टोमॅटो फेकल्याची घटना घडली,. त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. दत्ता यांनी मात्र हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आणि खोटे असल्याचे म्हटलं आहे.
TMC Downfall Context : सत्तेतून बाहेर पडताच टीएमसी नेत्यांवर कारवाईचा बडगा
तब्बल 15 वर्षे पश्चिम बंगालवर एकछत्री अंमल गाजवल्यानंतर यंदा टीएमसीला सत्ता गमवावी लागली आहे. सत्ता जाताच पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांवर विविध प्रकरणांमध्ये कारवाई सुरू झाली आहे. यापूर्वी माजी आमदार जहांगीर खान, टिळक कुमार चक्रवर्ती आणि पारितोष दत्ता अशा अनेक बड्या नेत्यांना वेगवेगळ्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.
तसेच, नुकतेच टीएमसीच्या 80 पैकी 58 आमदारांनी तर 28 पैकी 20 लोकसभा खासदारांनी बंडखोरी करत भाजप प्रणीत एनडीए'(NDA) सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून ममता बॅनर्जी यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचं चित्र आहे.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.