पतीने पत्नीचा खून केला, मृतदेहासोबत सेल्फी काढला

कोइम्बतूरमधील धक्कादायक घटना : सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट

वृत्तसंस्था/ कोइम्बतूर

तामिळनाडूतून धक्कादायक घटना समोर आली आहे. गांधीपुरमनजीक वर्किंग वुमेन हॉस्टेलमध्ये एका 32 वर्षीय इसमाने स्वत:च्या पत्नीची हत्या केली आहे. या इसमाची पत्नी याच हॉस्टेलमध्ये राहत होती. हत्येनंतर इसमाने स्वत:च्या पत्नीच्या मृतदेहासोबत सेल्फीही घेतला आणि तो स्वत:च्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर लावला आणि ‘विश्वासघाताची किंमत मृत्यू’ असल्याचे नमूद पेले आहे.

रथीनपुरी पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीला अटक केली असून तो तिरुनेलवेली येथील एस. बालामुरुगन असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत:च्या पत्नीचे अन्य कुणासोबत अनैतिक संबंध होते असा संशय बालामुरुगनला होता.

11 वर्षांपूर्वी विवाह

बालामुरुगनचा विवाह 11 वर्षांपूर्वी श्री प्रिया (30 वर्षे)सोबत झाला होता. ती देखील तिरुनेलवेली येथील रहिवासी होती. या दांपत्याला  10 वर्षीय मुलगा आणि तीन वर्षीय मुलगी आहे. चार महिन्यांपूर्वी पती-पत्नीदरम्यान भांडण झाले होते. ज्यानंतर  श्री प्रिया हे पतीला सोडून कोइम्बतूर येथे पोहोचली होती.

मुलांना सोडून एकटीचे वास्तव्य

श्री प्रियाने स्वत:च्या दोन्ही अपत्यांना बालामुरुगनकडेच सोडले होते. कोइम्बतूरमध्ये एका बॅगच्या दुकानात काम करण्यास तिने सुरुवात केली होती. बालामुरुगनच स्वत:च्या मुलांची देखभाल करत होता.

अनैतिक संबंधांचा संशय

बालामुरुगन आणि श्री पिया यांच्यात अनैतिक संबंधांवरून भांडण झाले होते. श्री प्रियाचे बालामुरुगनचा नातेवाईक इसाक्की राजासोबत अनैतिक संबंध होते. इसाक्की देखील विवाहित असून त्याला तीन अपत्यं आहेत. बालामुरुगनने श्री प्रियाच्या विवाहबाह्या संबंधांना विरोध केला होता, याचवरून त्यांच्यात भांण झाले होते.

समजूत काढण्यासाठी पोहोचला पण…

बालामुरुगनने शनिवारी कोइम्बतूर येथे प्रियाची भेट घेत राजासोबतचे संबंध संपवून नव्याने आनंदी जीवन जगुया असे सांगितले होते. तर प्रियाने घरी परतण्यास नकार दिला तसेच स्वत:च्या मुलांशी बोलणेही तिने टाळले होते. याचदरम्यान इसाक्की राजाला बालामुरुगन कोइम्बतूर येथे पोहोचल्याचे कळले आणि त्याने बालामुरुगनला स्वत:चे आणि प्रियाचे एक आक्षेपार्ह छायाचित्र पाठविले होते.

हॉस्टेलमध्ये वाद

संतापाच्या भरात बालामुरुगन प्रियाला भेटण्यासाठी हॉस्टेलमध्ये पोहोचला, तेथे संबंधित छायाचित्रावरून त्यांच्यात भांडण झाले. अचानक बालामुरुगनने स्वत:च्या बॅगमधून धारदार अस्त्र बाहेर करत तिच्यावर वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बालामुरुगनने मृतदेहासोबत सेल्फी घेत तो स्वत:च्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर पोस्ट केला. या घटनेची माहिती मिळताच तेथे पोहोचून पोलिसांनी पत्नीच्या मृतदेहानजीक बसलेल्या बालामुरुगनला अटक केली

Comments are closed.