मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय कांचन साळवीला अटक
मनोज जरंगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आलेल्या जीवेमारण्याच्या धमकी प्रकरणी (Death Threat) मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. कांचन साळवी (Kanchan Salvi) असे या आरोपीचे नाव आहे. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. दरम्यान याच प्रकरणाचा अधिक तपास करत रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन, चौकशी अंती त्याला अटक केलंहे.
Conspiracy To Kill Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाला अटक!
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाप्रकरणी कांचन साळवी (Kanchan Salvi) याला जालना पोलिसांनी अटक केली आहे. साळवी हा आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा जरांगेंनी केला होता, जे आरोप मुंडे यांनी फेटाळले आहेत. अटकेपूर्वी कांचन साळवीने आपली बाजू मांडली होती, ‘गरडसाहेब माझा अर्थार्थिकपणतच संबंध नाहीये. जे पण काही चौकशी असेल, नार्कोटिक्स असेल, त्यावर मी पूर्णपणे समोर जायला तयार आहे.’ या अटकेमुळे आता पोलीस तपासात साळवी, गरड आणि अमोल खुने यांच्यातील संबंधांची चौकशी केली जाईल. दरम्यान, कालच माध्यमांसमोर येऊन कांचन साळवी याने आपण अमोल खूनेला ओळखतो. मात्र दादा गरडशी आपला कसलाही संबंध नव्हता, तोच आपल्याला काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता, असा आरोप कांचन साळवी यान केला होता.
Manoj Jarange News : हत्येच्या कटाप्रकरणी या पूर्वी दोन आरोपींना अटक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी, गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा समर्थक असल्याचं सांगितलं जातं आहे.
Manoj Jarange Vs Dhananjay Munde : मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा धनंजय मुंडेंनी केली मागणी
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.