दारूखाना येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या!

दारूखाना येथील मूलभूत सुविधांसाठी शिवसेना नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात शिवसेना उपनेते, भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आमदार मनोज जामसुतकर यांनी विविध समस्या मांडल्या अणि योग्य त्या कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात अशी विनंती केली.

सदर बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकोपयोगी कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी भायखळा विधानसभा संघटक मंगेश बनसोड, शाखाप्रमुख निंगप्पा चलवादी, उपशाखाप्रमुख सुरेश चलवादी, ई वॉर्ड महानगरपालिकाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख अधिकारी, बेस्टचे प्रमुख अधिकारी सदर बैठकीला उपस्थित होते.

Comments are closed.