दिन तुंबारा, बाटाओ कहान … … मी झारखंडला आलो आहे; मॅनसेन्गर दुबेन थेट कमकुवत झाले आहेत
राज ठाकरे वर प्रकाश महाजन: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलं होतं. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला पटकून पटकून मारु, असं निशिकांत दुबे म्हणाले होते. निशिकांत दुबेंच्या या विधानावरुन राज ठाकरेंनी देखील प्रतिआव्हान दिलं आहे. दुबे..तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं. यानंतर निशिकांत दुबेंनी पुन्हा एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली?, असं त्यांनी म्हटले आहे. आता यावरून मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
प्रकाश महाजनांना थेट थेट आव्हान दिले जाते
प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरे आमचे सेनापती आहेत. मी त्याच्या एक पाऊल पुढे गेलो आहे. दिन तुम्हारा, बताओ कहाँ… हवं असल्यास झारखंडलाही येतो, असे आव्हान त्यांनी निशिकांत दुबेंना दिले आहे. ते पुढे म्हणाले की, मराठी कुठे गेले नाही. अफगाण आम्हाला भीत होतं आणि हा शहाणा सांगतोय की, राज ठाकरेंना मी हिंदी शिकवतो. अरे राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफीकडून मराठी गाणे गाऊन घेतले आहेत. आमच्याकडे कावळा देखील मराठीत बोलतो. माझं नशीब आहे की, प्रत्येक भाजपा खासदाराला मला आव्हान द्यावे लागते. मुख्यमंत्री काहीही बोलत नाही, त्यांना समज देत नाहीत, असे म्हणत त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंवर हल्लाबोल केलाय.
प्रकाश महाजनांची मनोज तिवारींवर टीका
राज ठाकरे यांच्यासारख्या प्रवृत्तीला शिक्षा मिळावी, असे वक्तव्य मनोज तिवारी यांनी केले होते. याबाबत विचारले असता कोण मनोज तिवारी? तो नाच्या. तू लाव तुझा सिनेमा मुंबईत मग दाखवतो. भाजपने असले लोक आमच्यावर सोडू नये. त्यांना हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.
रॉयल्टी कमकुवतपणाचे आव्हान असू नये
दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो…दुबे..तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
https://www.youtube.com/watch?v=adaltduv-hk
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.