शेवटच्या क्षणी मुंबई काँग्रेसची मोर्चात एन्ट्री; होय नाही करत भाई जगताप व्होट चोर, गद्दी छोड घो


MNS MVA सत्याचा मोर्चा मुंबई: मुंबईत आज (1 नोव्हेंबर) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सह विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘सत्याचा मोर्चा’ (Satyacha Morcha in Mumbai) काढला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तिन्ही नेते एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मोर्चासाठी एका बाजूने जय्यत तयारी सुरू असतानाच मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गटबाजीचे स्वर उमटल्याचे दिसून आले. मुंबई काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याबाबत कोणताही अधिकृत संदेश पाठविण्यात आलेला नव्हता, अशी माहिती समोर आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निर्देश दिले असले, तरी मुंबई काँग्रेसचा स्वतंत्र दर्जा असल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे काँग्रेसचे नेते या मोर्चात सहभागी होणार का नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अगदी शेवटच्या क्षणी मुंबई काँग्रेसने मोर्चात एन्ट्री घेतल्याचे दिसून आले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), भाई जगताप (Bhai Jagtap) व्होट चोर, गद्दी चोरच्या घोषणा देत मोर्चात सहभागी झाले.

Balasaheb Thorat: राहुल गांधींनी हा विषय सर्वात प्रथम देशात मांडला : बाळासाहेब थोरात

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुल गांधींनी हा विषय सर्वात प्रथम देशात मांडला आहे. तो प्रत्येक राज्यात आहे. महाराष्ट्रात विधानसभेत झालेला घोळ घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करायला निघालेले आहेत. याचा विरोध जनतेतून होणे साहजिक असल्याचे त्यांनी म्हटले.

Vijay Wadettiwar: त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी झालो : विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मताची चोरी कोण करत आहे आणि कशी चोरी होत आहे? हे पकडून देण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे जिथे जिथे लोकशाही वाचवायची असेल आणि पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत तिथे काँग्रेस राहील आणि काँग्रेस राहणार. त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी झालो आहे, असे त्यांनी म्हटले.

Bhai Jagtap: मतदार यादांच्या विरोधातील हा आवाज : भाई जगताप

भाई जगताप म्हणाले की, ज्या यादीच्या आधारे व्होट चोरी करून हे विधानसभेत आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आमचे नेते इथल्या निवडणूक आयोगाला भेटले, तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही यात लक्ष घालू. परंतु, त्यावर काहीच झाले नाही. उलट विधानसभेच्या याद्या वापरल्या गेल्या त्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत वापरायला सुरुवात करण्यात आली आहे. याच्या विरोधातला हा आवाज आहे, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

MNS MVA Satyacha Mocha Mumbai: मृत असूनही मतदान करताय त्यांना घेऊन जायला आलोय; मनसे-महाविकास आघाडीच्या मोर्चात यमराजाची एन्ट्री

आणखी वाचा

Comments are closed.