नवा कर्णधार, नवी टीम अन् आता नवा ट्विस्ट; BCCI च्या निर्णयाने चाहतेही चक्रावले, ऐनवेळी मोहम्मद

मोहम्मद सिराज आयर्लंड आणि इंग्लंड T20I मधून बाहेर : भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी आता प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

सध्या अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर असून नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात भारताने डाव आणि तब्बल 300 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 जून रोजी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना होईल, जिथे दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. या मालिकेनंतर टीम इंडिया थेट इंग्लंडमध्ये दाखल होणार असून तेथे पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा, आता अचानक बाहेर (Mohammed Siraj Ruled Out T20Is)

या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता बीसीसीआयने अचानक संघात बदल जाहीर केला आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सिराजला वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम आणि संघ व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. आगामी व्यस्त आंतरराष्ट्रीय हंगाम लक्षात घेता सिराज पूर्णपणे तंदुरुस्त राहावा आणि दुखापतीचा धोका टाळावा, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

सिराजच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाला मोठी संधी मिळाली आहे. उंच, अतिरिक्त उसळी आणि वेगाच्या जोरावर प्रसिद्ध कृष्णा प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी भारतीय संघासाठी उपयुक्त ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

श्रेयस अय्यर टीम इंडियाचा नवा कर्णधार(Shreyas Iyer Team India new Captain)

दरम्यान, या मालिकांमधून भारतीय टी-20 संघात नव्या पर्वाची सुरुवात होताना दिसत आहे. श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून तो आता पूर्णवेळ कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सूर्यकुमार यादवला खराब फॉर्ममुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तर युवा फलंदाज तिलक वर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी. अत्यंत कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या वैभवकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकांसाठी भारतीय संघ (Team India squad Update) :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा.

हे ही वाचा –

Ruturaj Gaikwad Century : ऋतुराजला तोड नाही भाऊ… निवड समितीने डावललं, ऐनवेळी एन्ट्री मारली अन् पहिल्याच सामन्यात शतक! सर्वांना केलं गप्प

Comments are closed.