पाकिस्तानी चेअरमनवर हातापाया पडण्याची वेळ, श्रीलंकेच्या खेळाडूंसमोर गयावया, मोहसीन नक्वीचा VIDE


मोहसीन नक्वीने श्रीलंकेचे खेळाडू म्हणून हात जोडले: इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर पाकिस्तान-श्रीलंका एकदिवसीय मालिका रद्द होण्याच्या मार्गावर होती. श्रीलंकेच्या संघात भीतीच वातावरण होत आणि सुमारे आठ खेळाडूंनी ताबडतोब मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानी क्रिकेटसाठी एक मोठा आंतरराष्ट्रीय पेच ठरू शकला असता. पण, घटनांनी अचानक वळण घेतले. श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर, संघाने आपला निर्णय मागे घेतला.

मोहसीन नक्वीवर हातापाया पडण्याची वेळ

परिस्थितीमुळे दिलासा मिळाल्याने, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी गुरुवारी सराव मैदानावर पोहोचले आणि श्रीलंकन खेळाडूंना त्यांच्या निर्णयाबद्दल आभार मानले. या कृतीमुळे पाकिस्तान मोठ्या परदेशी अपमानापासून वाचला. खरंतर, श्रीलंकन टीमच्या मनातील सुरक्षेच्या भीतीचे बीज 2009 च्या हल्ल्यात आहे. 2009 मध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमकडे जात असताना श्रीलंकन क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्या हल्ल्यात सहा श्रीलंकन खेळाडू जखमी झाले, तर सहा पाकिस्तानी पोलिस आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता.

गृहमंत्रालयाने सांगितले की, इस्लामाबादमधील आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सेना प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी थेट हस्तक्षेप करून श्रीलंकेचा दौरा वाचवला. श्रीलंकन खेळाडूंनी सामन्यांना नकार दिल्यानंतर मुनीर यांनी श्रीलंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणली. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने उशिरा रात्री जाहीर केले की उच्चस्तरीय बैठकीनंतर त्यांची टीम पाकिस्तान दौरा सुरू ठेवणार आहे.

तिंरगा मालिकेच्या वेळापत्रकात बदल

इस्लामाबादमधील हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 त्रिकोणी मालिकेचे वेळापत्रक बदलले आहे. आता ही मालिका 17 नोव्हेंबरऐवजी 18 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि दुसरा सामना 20 नोव्हेंबरला खेळला जाईल. तसेच संपूर्ण स्पर्धा फक्त रावळपिंडी येथे घेण्याचा निर्णय झाला आहे. आधी लाहोरमध्ये पाच सामने आणि 29 नोव्हेंबरचा अंतिम सामना खेळवायचा होता, परंतु आता तीनही क्रिकेट बोर्ड फक्त रावळपिंडीमध्ये सामने घेण्यावर सहमत झाले आहेत.

तिरंगा मालिकेचे वेळापत्रक : (Pakistan T20I Tri-Series Full schedule Update)

18 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
20 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
22 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
23 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
25 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
27 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
29 नोव्हेंबर – अंतिम सामना

(सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर)

हे ही वाचा –

Kuldeep Yadav Requests BCCI Leave Wedding : कुलदीप यादवचा अचानक घेतलेला निर्णय चर्चेत; आफ्रिका दौऱ्यातच टीम इंडियाला सोडणार, BCCIकडे केली सुट्टीची मागणी

आणखी वाचा

Comments are closed.