मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अबांनींच्या नावावर किती कंपन्या?दिवसाची कमाई किती

मुकेश अंबानी मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या कंपन्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वात रिलायन्स तेल आणि पेट्रोकेमिकल कंपनीच्या ओळखीपासून टेलिकॉम, डिजिटल आणि ग्राहक सेवा कंपनीत देखील पाऊल टाकत महत्त्वाचं स्थान मिळवलं. मुकेश अंबानी अनेक कंपन्यांचे मालक आहेत ज्याचं बाजारमूल्य कोट्यवधी रुपये आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या किती कंपन्या आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मुकेश अंबानी किती कंपन्यांचे मालक?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस, नेटवर्क18, Viacom 18, जिओ हॉटस्टार, जिओ सावन नेटवर्क, डेन नेटवर्क्स, हॅथवे केबल आणि डेटाकॉम, इंडिपेंडेंस या कंपन्यांची मालकी मुकेश अंबनी यांच्याकडे आहे.

याशिवाय जस्ट डायल, आलोक इंडस्ट्रीज, स्टर्लिंग एंड विल्सन रिन्यूऐबल एनर्जी, अर्बन लॅडर, GTPL हॅथवे, नेटमेड्स, रिलायंस इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर चा व्यवसाय देखील ते सांभाळतात.

रिलायन्स रिटेल, कॅम्पा कोला, जिओ मार्ट, अजिओ, रिलायंस ट्रेंड्स, स्मार्ट बाजार, टीरा ब्यूटी, रिलायंस फ्रेश या सारख्या कंपन्यांचा देखील त्यात समावेश आहे.

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, इन्फोमीडिया प्रेस, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड, रिलायन्स लाइफ सायन्सेस, रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्वेस्टमेंट्स सारख्या कंपन्या मुकेश अंबानी यांच्या नावावर आहेत.

मिनिटात कोट्यवधींची कमाई

फोर्ब्सच्या 20 जुलैच्या रिअल टाइम डेटानुसार  मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 111.5 बिलियन डॉलर आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 18 व्या क्रमांकावर आहेत. मिडिया रिपोर्टनुसार मुकेश अंबानी एका दिवशी 163 कोटी रुपयांची कमाई करतात. एका अंदाजानुसार ते 1.5 कोटी रुपये एका मिनिटाला कमावतात. ते अडीच लाख रुपयांची कमाई करतात. मुकेश अंबानी यांची जीवनशैली अलिशान आहे. मुंबईतील त्यांच्या अँटीलियाची किंमत 15000 कोटी रुपये आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.