मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील


मुंबई : क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (अर्जुन तेंडुलकर) याला मुंबई इंडियन्सने (MI) गत सत्रासाठी झालेल्या मेगा लिलावात त्याच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले होते. मात्र, अर्जुन 2025 मध्ये एकही सामना खेळला नाही, आता IPL 2026 (IPL) पूर्वी डिसेंबरमध्ये मिनी लिलाव होणार आहेत. 15 नोव्हेंबर रोजी रिटेन्शन लिस्ट जारी केली जाईल आणि हे स्पष्ट होईल की कोणत्या फ्रँचायझीने कोणत्या खेळाडूला रिटेन (कायम) केले आणि कोणाला रिलीज (मुक्त) केले. दरम्यान, मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, आता आयपीएलच्या लिलावाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी?

क्रिकबझ वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि शार्दुल ठाकूर यांच्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, दोघांची अदलाबदल होऊ शकते, तथापि, हे पूर्णपणे कॅश ट्रान्सफर (पैसे देऊन खेळाडू घेणे) असू शकते.

आयपीएल ट्रेड नियमांनुसार, बीसीसीआय (BCCI) कोणत्याही ट्रान्सफरची अधिकृत घोषणा करू शकते, त्यामुळे कदाचित दोन्ही फ्रँचायझी काही बोलू इच्छित नाहीत. मात्र, मुंबई क्रिकेटशी संबंधित एका सूत्राने क्रिकबझला माहिती दिली की, या दोघांमध्ये ट्रेड होण्याची शक्यता आहे, पुढील काही दिवसांत याची घोषणा होऊ शकते.

अर्जुन तेंडुलकरची आयपीएलमधील कामगिरी कशी?

शार्दुल ठाकूर मागील वर्षी झालेल्या मेगा लिलावात अनसोल्ड (न विकला गेलेला) राहिला होता, त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 2 कोटी रुपयांमध्ये रिप्लेसमेंट म्हणून आपल्या स्क्वॉडमध्ये (संघ) सामील केले होते. ठाकूरने 2025 च्या सत्रात एकूण 10 सामने खेळले, ज्यात त्याने 13 विकेट्स घेतल्या. ठाकूर चांगली फलंदाजीही करतो, तथापि, मागील सत्रात त्याने बॅटने फारसे योगदान दिले नाही. तर, अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलायचं झाल्यास, त्याला मागील सत्रात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या सत्रापासून (2023) अर्जुन मुंबईसोबत आहे, पण फारसा प्रभाव पाडू शकला नाही. 2023 मध्ये अर्जुनने 4 सामने खेळले, ज्यात एकूण 3 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये त्याला फक्त 1 सामना खेळायला मिळाला, ज्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर, गत 2025 मध्ये त्याला एकही सामना खेळता आला नाही. त्यामुळे, अर्जुनच्या क्रिकेट करिअरसाठी हा वेगळा निर्णय होऊ शकतो.

हेही वाचा

राशिद खानसोबतची ‘ती’ गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.