जोगेश्वरीच्या रायगड मिलिटरी स्कूलचा निकाल 100 टक्के!

ओशिवरा जोगेश्वरी पश्चिम येथील रायगड मिलिटरी स्कूलचा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा दहावीचा निकाल सलग चौदाव्यांदा 100 टक्के लागला आहे. या स्कूलमध्ये प्लेग्रुप/ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंत सीबीएसई बोर्ड आहे. गेल्या चार वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळावे यासाठी संस्थेच्या चेअरमन मॅनेजिंग ट्रस्टी राजीव घरत, सरचिटणीस अजय पाटणकर, मुख्याध्यापिका आरती झा, रचना घरत, रमेश यादव आणि शिक्षकांच्या, पीटीए सदस्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले.

Comments are closed.