पालिकेने म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले

मुंबई महापालिकेने 2012 पासून म्हाडाच्या उपकराची तब्बल 130 कोटी रुपयांची रक्कम थकवल्यामुळे उपकरप्राप्त इमारतींच्या संरक्षणात्मक दुरुस्ती व पुनर्रचनेच्या कामासाठी निधीची चणचण भासत आहे.

दक्षिण मुंबईत सुमारे 13 हजार उपकरप्राप्त इमारती आहे. या उपकरप्राप्त इमारतींमधील मालक आणि भाडेकरू यांच्याकडून महापालिका उपकर वसूल करते. यातील 10 कोटी रुपये दरवर्षी पालिका म्हाडाला अदा करते. या उपकराच्या रकमेतून म्हाडा मंडळाच्या अखत्यारितील उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीची कामे केली जातात. मात्र, गेल्या तेरा वर्षापासून म्हणजेच 2013 पासून पालिकेने उपकराची रक्कम म्हाडाला दिलेली नाही. त्यामुळे आता या थकबाकीचा आकडा 130 कोटींवर पोहोचला आहे, असे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Comments are closed.