पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासह भाजपला खिंडार, ‘या’ नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश


मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गाठी भेटी सुरु केल्या आहेत. अनेकांचे सत्ताधारी पक्षात प्रवेश होताना दिसत आहे. दरम्यान, अशातच मुंबई महानगर पालिका निवडणूकीपूर्वी बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटासह आणि भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये ठाकरे गटाच्या शाखा समन्वयक भूषण माळदवेंसह  शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. तसेच भाजपा कांदिवली पूर्व विधानसभा सचिव दिपालीताई माटे सुद्धा मोठा शक्ती प्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश

मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सर्व ठाकरेंचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केलेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मत मोजणी होणार आहे. दरम्यान अद्याप महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होताच राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा देखील होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. राज्यातली राजकीय परिस्थिती पहाता महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे,  मुंबई महापालिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

पक्षप्रवेशामुळे मागाठाणे मतदार संघात शिंदे गटाला मोठं बळ

तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.  मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे मागाठाणे मतदार संघात शिंदे गटाला मोठा बळ मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकच्या पूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बिहारचे निकाल आश्चर्यजनक, सुरुवातीपासून निष्पक्ष नसलेल्या निवडणुकीत जिंकू शकलो नाही, लोकशाही रक्षण सुरु ठेवणार : राहुल गांधी

आणखी वाचा

Comments are closed.