Mumbai News – आधी साप चावल्याचा आरडाओरडा, टॅक्सी थांबताच व्यावसायिकाची सी-लिंकवरून समुद्रात उडी

वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी घेत व्यावसायिकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित शांतीलाल चोप्रा असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. चोप्रा हे टॅक्सीने प्रवास करत होते. टॅक्सी सी-लिंकवर येताच चोप्रा यांनी साप चावल्याचा आरडाओरडा केला. टॅक्सी चालकाने घाबरून गाडी थांबवताच चोप्रा यांनी बाहेर येत सी-लिंकवरून समुद्रात उडी घेतली. चोप्रा यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
चोप्रा यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय असून ते कुटुंबासोबत अंधेरी परिसरात वास्तव्यास होते. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता चोप्रा यांनी अंधेरीसाठी टॅक्सी पडली. टॅक्सी सी-लिंकवर येताच चोप्रा यांनी साप चावल्याचा आरडाओरडा केला. टॅक्सी चालकाने घाबरून लगेच टॅक्सी थांबवली. टॅक्सी थांबतचा चोप्रा यांनी बाहेर येत सी-लिंकवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली.
टॅक्सी चालकाने सी-लिंक कर्मचारी आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पोलिसांना चोप्राकडे कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलीस चोप्रा यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी करत आहेत.
Comments are closed.