मुंबई फिरायला आला अन् घात झाला, निर्माणाधीन इमारतीवरून सळई डोक्यात पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकहून मुंबईत फिरायला आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंधेरीतील मरोळ परिसरात घडली. अमोल पगारे असे मयत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. अमोलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अमोल पगारे हा तरुण बुधवारी सकाळी नाशिकहून मुंबईत फिरण्यासाठी आला होता. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अमोल मरोळ नाका परिसरात गेला होता. मरोळ नाका मेट्रो स्टेशनजवळ प्रिविलोन या विकासकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एक सळई अमोलच्या डोक्यात पडली. यात अमोलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेसंदर्भात पोलीस सखोल तपास करत आहेत.

Comments are closed.