‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर कारवाईचा बडगा; पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


सत्याचा मोर्चा मुंबई मुंबई : मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’मुळे राजकीय वातावरण तापले आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंनी दुबार मतदारांचे पुरावे सादर करत निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी केली. या आरोपांना भाजपने ‘मूक आंदोलना’ने उत्तर दिले. अशातचमुंबई पोलिसांनी महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी आयोजित केलेल्या संयुक्त रॅली आणि ‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाहे.

Satyacha Morcha Mumbai : बेकायदेशीर सभा आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन, आयोजकांवर गुन्हा दाखल

मुंबईच्या रस्त्यावर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन बघायला मिळालं. मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) मोर्चा काढला, तर भाजपने याला ‘फेक नरेटिव्ह’ म्हणत मूक आंदोलन केलं. भाजपने ‘जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी, ही विरोधकांची भूमिका आहे,’ असा थेट आरोप केला. या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असं नाव देण्यात आलं असून, यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.

भाजपने MVA च्या या आंदोलनाला नौटंकी आणि असत्याचा फॅशन शो म्हटलं आहे, तर दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीची गरज असल्याचं मात्र मान्य केलं आहे. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले असताना आता बेकायदेशीर सभा आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रॅली आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Police : पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकर्ली

मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ (Satyacha Morcha) वरून राजकारण तापले आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती, दरम्यान यापूर्वी झालेल्या मराठा आंदोलनावेळी (Maratha Andolan) सर्वसामान्यांना झालेल्या त्रासामुळे आणि उच्च न्यायालयाच्या (High Court) नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पोलीस परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलल्या जात होते. जर परवानगीशिवाय मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला, तर आयोजकांवर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे या मोर्चाचे भवितव्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय? (MNS And Mahavikas Aghadi Demands)

1. मतदारयाद्या अद्ययावत करा.

2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.

3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.

4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.