उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर


Maharashtra Nagarparishad Election Result: आज राज्यभरात होत असलेल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत (Nagarparishad Election Result) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत (Nagarparishad Election Result) न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल 21 तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत (Nagarparishad Election Result) निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितलं आहे, आता या निर्णयानंतर  त्याचे काय परिणाम होऊ शकतील ते समोर आले आहेत.

Nagarparishad Election Result:  उद्याची मतमोजणी रद्द, आता काय परिणाम होणार?

* प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागतील.
* ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागेल.
* शिवाय सर्व स्ट्रॉंग रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल.
* स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. ती प्रक्रिया रोज 21 नोव्हेंबर पर्यंत पार पाडावी लागेल.
*विधानसभेला साधारणपणे 288 ठिकाणी मतमोजणी असते, जवळपास तेवढेच मतमोजणी ठिकाण नगर परिषद निवडणुकीत आहेत. मात्र, लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी वोटिंग नंतर लगेच एक किंवा दोन दिवसात होते.
* म्हणजे आज मतमोजणी समोर ढकलली गेली, तर विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी एवढी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागेल.

Nagarparishad Election Result:  नव्या निवडणूक कार्यक्रमाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांचा तर्क

१) आधी जे चिन्ह मिळाले होते, ते घेऊन प्रचार झाला आहे, त्यामुळे आता नव्या प्रक्रियेत नवे चिन्ह देऊ नये, चिन्ह बदलले जाऊ नये

२) निवडणुका रद्द होईपर्यंत  बराच खर्च झालेला आहे, त्यामुळे त्या खर्चाचे काय??? खर्चाची मर्यादा वाढविली पाहिजे

३) 20 तारखेची polling होईपर्यंत कोणतेही Exit poll प्रसारित होऊ नये…

आणखी वाचा

Comments are closed.