समांथाच्या लग्नानंतर नागाने चैतन्यने पोस्ट केलेला फोटो झाला व्हायरल, वाचा नेमकं काय घडलं?

घटस्फोटाच्या चार वर्षानंतर साऊथची सुपरस्टार समांथा प्रभूने पुन्हा एकदा लगीनगाठ बांधत सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. समंथाने सोशल मिडियावर लग्नाचे फोटो शेअर करताच, तिचा आधीचा पती ने देखील इंस्टाग्रामवर एक
पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये नागा चैतन्यचा उतरलेला चेहरा पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध साउथ अभिनेत्री समंथा प्रभूने १ डिसेंबर २०२५ रोजी तिने “द फॅमिली मॅन” चे दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केले. त्यांनी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील सद्गुरु ईशा योग केंद्रातील मंदिरात कोणालाही माहित न पडता, लग्न केले. तिने लाल साडीतील तिच्या लग्नाचे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. दरम्यान, तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य याने सोशल मीडियावर टाकलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला.
यातील महत्त्वाची बाब म्हणजे नागा चैतन्यने कोणत्याही दुःखात हा फोटो पोस्ट केला नाही. तर त्याने त्याच्या आगामी “धूत” या वेब सीरिजमधला त्याचा लूक त्याने पोस्ट केला. नागाने पोस्ट केलेला हा फोटो दुरान्वये समांथाच्या लग्नाशी संबधित नाही. योगायाेग इतकाच की नागाची वेब सीरिज आणि समांथाचे लग्न या दोन्ही गोष्टींचा मेळ जुळून आला होता. बाकी मात्र नागाला समांथाच्या लग्नाचे कुठलेही सोयरसुतक नाही.

Comments are closed.