विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार,

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत भाजपची मते फुटणार नाही, याची खबरदारी म्हणून भाजप नागपूरातील त्यांच्या सर्व नगरसेवकांना तीन दिवस गोव्यात (Vidhan Parishad Election 2026 BJP) नेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस मुंबईत मुख्यमंत्र्यांशी भेट (Vidhan Parishad Election 2026 BJP) आणि दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात नगरसेवक सहभागी होणार आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 17 जूनला सर्व नगरसेवक नागपुरात परत येणार आहे.(Vidhan Parishad Election 2026 BJP)

Vidhan Parishad Election 2026 BJP:  नगरसेवकांना ३ दिवस गोव्यात ठेवणार; संपूर्ण ‘टूर प्लॅन’ समोर

* 10 जून रेल्वेने नागपुरातून मुंबईकडे रवानगी करण्यात येणार आहे.
* 11 जून मुंबईतून गोव्याला जाणार.
* 14 जून पर्यंत गोव्यात मुक्काम.
* 14 जून रोजी मुंबईत परत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट.
* 15 आणि 16 जून “रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी” येथे नगरसेवकांसाठी खास प्रशिक्षण शिबिर.
* 17 जूनला रेल्वेने नागपूर परत येतील.
* 18 जून विधान परिषद निवडणुकीचा मतदान.
* या संपूर्ण सहलीसाठी नगरसेवकांकडून काही सहकार्य रक्कम घेण्यात आल्याची माहिती आहे.

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजपचे डॉ. राजीव पोतदार व काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे. महानगरपालिकेत भाजपचे (Vidhan Parishad Election 2026 BJP) संख्याबळ जास्त असले, तरी काँग्रेसच्या नेत्यांनी क्रॉसव्होटिंग होईल, असा दावा केला. या निवडणुकीत कुठल्याही पद्धतीने भाजपचे संख्याबळ कमी दिसायला नको व नगरसेवक एकसंघ राहावे, यासाठी पक्षाकडून विशेष पावले उचलण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच मतदानापर्यंत नगरसेवकांना नागपूरच्या रणधुमाळीपासून दूर ठेवण्यात येणार आहे. त्यांना अगोदर मुंबईत नियोजित अभ्यासवर्गाला नेण्यात येणार असून, त्यानंतर गोव्याला नेणार असल्याचं समोर आलं आहे. नगरसेवकांना मुंबईतील अभ्यासवर्गासाठी नेण्यामागे पक्ष संघटन, प्रशासन आणि आगामी स्थानिक निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्याचा उद्देश असला, तरी त्यानंतरच्या प्रस्तावित गोवा दौऱ्यामुळे घडामोडींना वेग आला आहे.(Vidhan Parishad Election 2026 BJP)

मतदान होईपर्यंत नागपूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांना स्थानिक राजकीय घडामोडींपासून दूर ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. यासाठी नगरसेवकांना प्रथम मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पक्षाच्या अभ्यासवर्गासाठी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा गोवा दौरा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. १० जून रोजी सर्व मतदारांना नागपूरच्या बाहेर नेण्याची शक्यता आहे. तर, मतदानाच्या अगोदर १७ जूनला ते परततील.(Vidhan Parishad Election 2026 BJP)

हेदेखील वाचा

Comments are closed.