बापच आळीपाळीने तीन मुलींचे लचके तोडत होता, चारवेळा गर्भपात; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
नालासोपारा : मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या नालासोपाऱ्यात एका इसमाने आपल्या पोटच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तिन्ही मुलींनी नालासोपारा (Nalasopara Rape case) पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचा पिता खंडणी, गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी नालासोपारा पोलिसांनी (Police) मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत. (Nalasopara Crime)
पीडित मुली या सख्ख्या बहिणी आहेत. त्या मूळच्या कोकणातील (Konkan) राहणार्या आहेत. मुलींचा 56 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला एकूण 5 मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा चार वेळा गर्भपातही (Abortion) करण्यात आला होता, अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाच्या आश्रयाला आली.
या तीन मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याराचाविरोधात (Sexual Assault) तक्रार करण्याचा निर्णय त्यांनी हिंमतीने घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नात्याला काळीमा फासणार्या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार
पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि वदर्ळीचे ठिकाण असलेल्या स्वारगेट एसटी आगारात मंगळवारी पहाटे एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला होता. आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीची दिशाभूल करुन तिला डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले आणि दार बंद करुन तिच्यावर दोनवेळा बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केलीस तर तुला ठार मारुन टाकेन, अशी धमकी त्याने तरुणीला दिली. या घटनेमुळे तरुणीला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. मात्र, दत्तात्रय गाडे निघून गेल्यानंतर तरुणीने मित्राला फोन केला. त्याच्या सांगण्यावरुन ही तरुणी पोलिसांकडे गेली आणि तक्रार दाखल केली होती.
https://www.youtube.com/watch?v=unqgcoplpwm
आणखी वाचा
स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
अधिक पाहा..
Comments are closed.