हृदयद्रावक! लपाछपीचा खेळ चिमुरड्याच्या जिवावर बेतला

नालासोपारा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लपाछपी खेळणं एका आठ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहराज शेख असे (8) त्या मुलाचे नाव आहे. मेहराज मित्रांसोबत लपाछपी खेळत होता. खेळत असताना अचानक तो बेपत्ता झाला होता. चार दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याचा बराच शोध घेऊनही तो सापडला नव्हता. अखेर 4 डिसेंबरला मेहराजच्या आईच्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी इमारतीच्या वरच्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत दुर्गंध येऊ लागल्याने शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मेहराज लपाछपी खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Comments are closed.