भाजपचं सरकार हे बेशरम, नालायक, कृषीमंत्र्यांच्या कोकाटेंच्या वर्तनावरुन पटोलेंचा हल्लाबोल

भाजपावर नाना पॅटोल: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे ( Manikrao Kokate) हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला. कृषीमंत्र्यांच्या अशा वर्तनावर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी भाजपप्रणित राज्य सरकारवर चांगलेचं ताशेरे ओढले  आहेत. जेव्हा जेव्हा सभागृहात शेतकऱ्यांचा मुदद्दा उपस्थित करण्यात आला, तेव्हा तेव्हा कृषीमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. ज्या वेळेस उपस्थित झाले तर ते रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं त्या व्हिडिओवरून दिसत असल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळं भाजपचं सरकार हे बेशरम, नालायक असून ते बधिर झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी केलाय. या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे, असा रोष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

भाजपचं सरकार हे बेशरम आणि नालायक सरकार आहे. बधिर झालेलं हे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचा बाप म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा बाप मोदी होऊ शकत नाही, शेतकरी तुमचा बाप होऊ शकतो असे नाना पटोले म्हणाले. कृषीमंत्र्यांच्या राजीनामा मागणार नाही, त्यात वेळ घालवण्यापेक्षा आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे. या सरकारला पायउतार करण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे असे पटोले म्हणाले.

रोहित पवारांनी शेअर केला होता व्हिडिओ

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली तर आम्ही भाजप श्रेष्ठींना विचारु, असे वक्तव्य नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी केले होते. यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. यात माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादीला कुठलीही गोष्ट भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाही. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासोबतच राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असून तरीदेखील यांना निर्णय घेता येत नाही. कारण प्रत्येक गोष्ट भाजपला विचारावी लागते. त्यामुळे आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.

महत्वाच्या बातम्या:

Manikrao Kokate : ‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं अजब उत्तर; म्हणाले, युट्युबची जाहिरात स्किप करताना…

आणखी वाचा

Comments are closed.