शासकीय नोकरी मिळण्यासाठी बापानं पोटच्या तिसऱ्या मुलीला विकलं, पत्नीला हाकलून दिलं, शेवटी…
Nanded Crime:शासकीय नोकरीसाठी एका बापाने स्वतःच्या तिसऱ्या मुलीला विकल्याचा प्रकार नांदेडमधून उघडकीस आला आहे . वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर शिपाई पदाची नोकरी गजानन वांजरखेडे यांना लागणार होती .पण सरकारी नोकरीसाठी तिसऱ्या आपत्त्याची अडचण येईल म्हणून पुढची मुलगी दुसऱ्याला देऊन टाकण्याचा विचार होता . यावरून आईने वाद घातला म्हणून तिलाही घराबाहेर हाकलून दिले .अखेर 8 वर्षांनंतर मुलीच्या आईला ही बाब कळल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .यावरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय .
नेमकं घडलं काय?
शासकीय नोकरीसाठी बापाने आपल्या पोटच्या मुलीला विकल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. नांदेडमधील सुरेखा ह्या महिलेचा 2009 साली गजानन वांजरखेडे याच्याशी विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. दरम्यान 2011 साली वांजरखेडे यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याने गजानन वांजरखेडे यांना अनुकंपा तत्वावर 2018 मध्ये हिंगोली येथिल दुय्यम उनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती. नोकरीसाठी तिसऱ्या आपत्याची अडचण येईल म्हणून एक मुलगी दुसऱ्याला देण्याचा विचार होता. यावरून पती पत्नीत वाद झाला. पत्नीला घराबाहेर हाकलून दिले. काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलीला एका नातेवाईकांना दिल्याची माहिती समजली. नंतर तपास केल्यानंतर मुलीच्या नावामागे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव दिसले. मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप महिलेने केलाय.
शासकीय नोकरीसाठी मुलगी नकोशी झाली अन्..
या विषयावरून दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी सुरेखा हिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. तिन्ही मुले पतिकडेच होती. सुरेखा यांनी चार घरची घरी धुणी भांडी करून गुजरान केली. आपल्या शुभांगी नावाच्या मुलीला पतीने एका नातेवाईकाला दिल्याची माहिती काही महिन्यापूर्वी सुरेखा यांना समजली. कुठलाही आधार नसणाऱ्या सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना निराधार महिलांना मदत करणाऱ्या एनजीओबद्दल माहिती मिळाली.
एनजीओच्या टीमने ज्यांच्याकडे मुलगी आहे तिथे संपर्क केला. त्या गावातून मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव दुसऱ्या व्यक्तीचे आढळले. मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव वेगळे होते. एनजीओकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप महिलेने केलाय. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पतीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये. पोलीसानी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरनाचा तपास करताहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.